उसाच्या यंत्रात हात गमावला

उसाच्या यंत्रात हात गमावला

Published on

उसाच्या यंत्रात हात गमावला
कळंबोलीत तरुणाची पाचही बोटे छिन्नविच्छिन्न
नवीन पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः उन्हाळ्यात उसाच्या रसाची अनेकांना भुरळ पडते; मात्र त्यासाठीची यंत्रणा अनेकदा अपघाताला निमित्त ठरते. कळंबोली सर्कल येथे उसाच्या यंत्रात अडकलेला तरुणाचा हात दीड तासांनी सोडवण्यात यश आले; पण अपघातात पाचही बोटे गमावली आहेत.
कळंबोली सर्कल येथे बुधवारी (ता. २२) सकाळी नऊच्या सुमारास एक तरुण ग्राहकांसाठी उसाचा रस काढत होता. याच दरम्यान, त्याचा हात अचानकपणे उसाच्या यंत्रामध्ये अडकला. हात दाबल्याने तरुण असह्य वेदनांनी ओरडत होता. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ यंत्र बंद केले. तरुणाच्या उजव्या हाताची पाचही बोटे यंत्रामध्ये अडकली होती. वेगवेगळ्या पद्धतीने मशीनमध्ये अडकलेला हात बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र त्यांना अपयश आले. सुमारे एक ते दीड तास या तरुणाचा हात मशीनमध्ये अडकून होता. अखेर घटनास्थळी उपस्थित असलेला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचा गणेश खंडागळे याने कळंबोली अग्निशमन केंद्रात कळविले.
---------------------------------
अग्निशमन दल धावून आले
कळंबोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल ठाकरे, सुरक्षा रक्षक खंडागळे उपस्थित होते. त्यानंतर अग्निशमन जवानांनी बॅटरी कटर, हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने तरुणाचा हात बाहेर काढला. अपघातग्रस्त तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com