मुंबईत छठपूजेला सुविधा पुरविण्यासाठी पालिका सज्ज
छटपूजेसाठी पालिका सज्ज
६७ ठिकाणी नियोजन; विविध सुविधा उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत ६७ ठिकाणी छटपूजेचे नियोजन केले आहे. १४८ कृत्रिम विसर्जन तलाव, ४०३ ठिकाणी वस्त्रांतरगृह (चेंजिंग रूम), तात्पुरते प्रसाधनगृह इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे.
छटपूजा आयोजित करणाऱ्या संस्था, मंडळांना आवश्यक परवानग्या व समन्वयासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलिस व वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी छटपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव, टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वाधिक तलाव व टाक्या या घाटकोपर परिसरात ४४, दहिसर २२ तर कांदिवली परिसरात १६ इतक्या आहेत. यंदा उत्सव साजरा करण्यासाठीची ठिकाणे आणि कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे.
पुरेशा पार्किंगची व्यवस्था
छटपूजेच्या काळात सर्व पूजास्थळांवर पुरेशा प्रमाणात निर्माल्य कलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा, आवश्यकतेनुसार टेबल व खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या उत्सवासाठी ४०३ वस्त्रांतरगृह उभारण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सुविधाही पुरविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
पालिकेचे आवाहन
नागरिकांनी खोल समुद्रात जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीत पालिकेच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त आणि समन्वय अधिकारी प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

