ढगफुटी सदृश्य पावसाने भात उत्पादक उद्धवस्त

ढगफुटी सदृश्य पावसाने भात उत्पादक उद्धवस्त

Published on

ढगफुटीसदृश पावसाने शेतकरी उद्ध्वस्त
भिवंडीत भातपीक पाण्याखाली
वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : भिवंडी तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो; मात्र शनिवारी (ता. २५) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे येथील भात उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले भातपीक पाण्याखाली गेल्याने ते पाण्यावर तरंगत असल्याची विदारक दृश्ये सध्या पाहायला मिळत आहेत. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिवाळीपूर्वी झालेल्या पावसातही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या संकटातून कसेतरी वाचलेले पीक आता पुन्हा पाण्याखाली गेले आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले होते, मात्र त्याची नुकसानभरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दिवाळीआधी झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते, मात्र दिवाळी होऊनही मागील नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. सध्याच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. सतत दोन वर्षांपासून भातशेती संकटात असल्याने, शेतकरीवर्ग संतप्त झाला असून, त्यांच्यात उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भातशेतीवर टांगती तलवार
सततच्या नुकसानीमुळे भात उत्पादक शेतकरी भातशेतीकडे पाठ फिरवतो की काय, अशी भीती या निमित्ताने व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com