खासगी रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग
खासगी रुग्णालयाच्या मीटर बॉक्सला आग
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : रामबाग परिसरातील साई श्रद्धा रुग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या विजेच्या मीटर बॉक्समध्ये रविवारी (ता. २६) पहाटे सुमारे ४ वाजता शॉर्टसर्किट होऊन आग भडकली. रुग्णालय प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि अग्निशामक दलाच्या त्वरित कारवाईमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पहाटेच्या वेळी मीटर बॉक्सला आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ सर्व रुग्णांना सुरक्षितरीत्या शेजारील रुग्णालयात हलवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे. दुर्घटनेमुळे रुग्णालयाचा विद्युतपुरवठा खंडित झाला असून, दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. विद्युतवाहिन्यांवरील आवरण घासले गेल्याने किंवा तापमान, आर्द्रता यामुळे नुकसान झाल्यास वायरिंगचे नुकसान होते. तसेच एका सर्किटवर गरजेपेक्षा जास्त विद्युत भार दिल्यास तारा ओव्हरहीट होऊन शॉर्टसर्किट होतो. बेसमेंटमध्ये किंवा वॉटर मोटरजवळ मीटर असताना ओलावा किंवा पाणी शिरल्यास वाहिनी खराब होते. जुन्या वायरिंगमध्ये देखभालीअभावी हा धोका अधिक असतो.
महावितरणकडून खबरदारीचे आवाहन
मीटर बॉक्स सातत्याने तपासा आणि त्यातील वाहिन्या व्यवस्थित घट्ट आहेत का, हे पाहा. ओलावा तसेच पाण्यापासून मीटर दूर ठेवून आसपास स्वच्छता ठेवा. गरजेपेक्षा जास्त विद्युत उपकरणे एका सर्किटवर जोडू नका. जुन्या किंवा कमी गुणवत्तेच्या वाहिन्यांची वेळोवेळी तपासणी व बदल करा. मीटर बॉक्सजवळ इतर वस्तू (गॅस सिलिंडर, पाणी मोटर, स्विच) ठेवू नका. तांत्रिक त्रुटी आढळल्यास तज्ज्ञ इलेक्ट्रीशियनची मदत घ्या, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

