कोटक बँकेला या तिमाहीत ४,४६८ कोटी रुपये नफा
मुंबई, ता. २६ ः जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कोटक बँकेला ४,४६८ कोटी रुपये एकत्रित नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत त्यांना ५,०४४ कोटी रुपये नफा झाला होता.
या तिमाहीत फक्त कोटक बँकेचा विचार केल्यास त्यांना ३,२५३ कोटी रुपये नफा झाला. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा ३,३४४ कोटी रुपये होता. कोटक सिक्युरिटीजचा नफादेखील घटला असून मागील वर्षीच्या ४४४ कोटींच्या तुलनेत त्यांना या तिमाहीत ३४५ कोटी रुपये नफा झाला. या तिमाहीत कोटक समूहांमधील फक्त कोटक असेट मॅनेजमेंट अँड ट्रस्टी कंपनी (मागील वर्षी १९७ कोटी, यावर्षी २५८ कोटी) तसेच कोटक अल्टरनेट असेट मॅनेजर्स (मागील वर्षी २२ कोटी, यावर्षी १०४ कोटी) यांचाच नफा फक्त वाढला आहे. त्याखेरीज कोटक महिंद्र प्राईम, कोटक महिंद्र इन्व्हेस्टमेंट, कोटक महिंद्र कॅपिटल कंपनी आणि कोटक महिंद्र लाइफ इन्शुरन्स या सर्वांचा नफा घटला आहे.
कंपनीची एकत्रित मालमत्ता ३० सप्टेंबर २०२४च्या तुलनेत १३ टक्के वाढून यावर्षीच्या ३० सप्टेंबर रोजी पाच लाख ७६ हजार कोटी रुपये झाली. तर याच कालावधीतील व्यवस्थापनाखालील मालमत्ता सात लाख ६० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. ती मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा १२ टक्के वाढली आहे. घरगुती म्युच्युअल फंडांच्या शेअरची मालमत्ता १४ टक्क्यांनी वाढून तीन लाख ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली.
कोटक बँकेची कर्जे यावर्षी ३० सप्टेंबर रोजी मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के वाढून चार लाख ६२ हजार कोटी रुपये झाली. तर एकूण ठेवीदेखील मागील वर्षीच्या तुलनेत १४ टक्के वाढून पाच लाख १० हजार कोटींपेक्षा जास्त झाल्या. ३० सप्टेंबर रोजी बँकेचे पाच कोटी २० लाख खातेदार आहेत. त्यांचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न ७,३११ कोटी रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

