कॉलम
कॉलम

कॉलम कॉलम

Published on

खमंग फराळासोबत दिवाळी संध्या साजरी
विरार (बातमीदार) : विरार पूर्वमधील जी. डी. गार्डन हाॅलमध्ये यंग स्टार्स ट्रस्टची दिवाळी संध्या कराओके, खमंग फराळासोबत नुकतीच रंगली. या वेळी आई तुझं देऊळ..., केव्हा तरी पहाटे..., या जन्मावर..., मेरी सपनों कि रानी..., तोबा ये मतवाली चाल..., ये मेरी जोहरजबी..., आन बान शान..., चाँदसी मेहबूबा अशी एकापेक्षा एक गाणी मनाला मोहून टाकणारी कराओकेवर सादर करण्यात आली. लिटिल चॅम्प जुई चव्हाण हिने लावणी सादर करत रसिकांची मने जिंकली. या वेळी माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी दिल हूम हूम हे गाणे गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमामध्ये बहुजन विकास आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच किल्ल्यांचा बक्षीस समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक अजीव पाटील यांच्या सहकार्याने व विलास बंधू चोरघे, प्रफुल्ल साने, प्रतिमा पाटील, ममता सुमन, निशाद चोरगे, राजेंद्र गावडे, अतुल चोरघे, अनिल पाटील, मिलिंद नाईक यांनी सहभाग नोंदवला. या वेळी माजी सभापती यज्ञेश्वर पाटील, चिरायू चौधरी, माजी नगरसेविका मीनल पाटील, झीनत शेख, सुरेखा कुरकुरे, भूषण चुरी उपस्थित होते.
---
अशेरीगडावर तोफगाड्यांसाठी दगड एकत्र
कासा (बातमीदार) : शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानने रविवारी (ता. २६) अशेरीगड येथे ३५ व्या श्रमदान मोहिमेदरम्यान गडावर नियोजित असलेल्या पाच तोफगाड्यांच्या पायासाठी लागणारे दगड एकत्र करण्याचे काम करण्यात आले. गडाच्या विविध भागातून जवळपास १५० हून अधिक मोठे दगड श्रमदानातून उचलून नियोजित ठिकाणी एकत्र करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व बोरीवलीतील रोहित आंबेकर आणि वसईतील अनिकेत कुडतरकर यांनी पार पाडले. या वेळी मीत पाडेकर, दीप नारकर, संदीप भोसले, अर्णव संदीप भोसले, भास्कर भुरटे, दिव्येश रावराणे, ऋषभ पाटील हे सहभागी झाले होते. तसेच गडावर भटकंतीसाठी आलेल्या दहा शिवप्रेमी युवकांनीदेखील श्रमदानात मोलाचे सहकार्य केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com