चुकी केली नाही दंड भरणार नाही, एसटी चालकाचा निर्धार
चूक केली नाही, दंड भरणार नाही; एसटी चालकाचा निर्धार
ठाण्याचे एसटीचालक संपाच्या मार्गावर
ठाणे शहर, ता. २६ (बातमीदार) ः एसटीकडून कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपये अग्रिम (उचल) म्हणून अदा करण्यात आली आहे. ही उचल पगारातून कपात केली जात असताना आरटीओकडून वसूल करण्यात आलेला दंडदेखील कापला जाणार आहे. त्यामुळे दिवाळी सरताच एसटी चालकांचे अच्छे दिन संपणार आहेत. दंड आणि घेतलेल्या उचलमुळे त्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. यामुळे चालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, नियमबाह्य दंडवसुलीविरोधात संपाचे शस्त्र उचलले जाणार असल्याचे समजते.
ठाणे-पुणे मार्गावर ठाणे एसटी विभागाच्या बस धावतात. त्यातील अनेक बसचे स्पीडो मीटर बंदावस्थेत असल्याने बसची गती चालकाच्या लक्षात येत नाही. परिणामी प्रादेशिक परिवहन विभागाकडून महामार्गावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात गती नियमाचा भंग झाल्याचा दंड त्या बसवर आकाराला जातो. बसवर आकारलेला हा दंड बस पासिंगच्या वेळेस प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) एसटी विभाग वसूल करते. त्यानंतर संबंधित बस कोण चालवीत होते त्या चालकाच्या पगारातून एसटीकडून कापला जातो, मात्र हा दंड चालकाच्या चुकीमुळे लागला नसून तो त्याच्या पगारातून कापता कामा नये. एसटीची कार्यशाळा यासाठी जबाबदार असल्याने तो दंड एसटीने भरावा, अशी मागणी कामगार युनियनकडून केली जात आहे, परंतु असे असतानाही एसटीचे अधिकारी तो दंड चालकाच्या पगारामधून कपात करत आहेत. याला चालकांनी विरोध केला असता महिनाभरापासून तो स्थगित करण्यात आला होता, परंतु आता त्याची वसुली पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे समजते.
ठाणे विभागातील ७०० चालकांना दंड
चूक केली नाही, दंड भरणार नाही
सातारा, बारामती, सांगली, स्वारगेट आदी ठिकाणी जाणाऱ्या बसला पूर्व द्रुतगती महामार्गावरून जावे लागते. गतीच्या नियंत्रणासाठी आरटीओने येथे ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत, मात्र आमच्या बसचे स्पीडो मीटर बंदावस्थेत असल्याने बसची गती लक्षात येत नाही. त्यामुळे असे दंड आम्ही भरणार नाही, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे.
ठाणे-पुणे मार्गावर चालकाला झालेले दंड :
चालक क्रमांक - ५८६२, दंड रक्कम -१,०१,०००
चालक क्रमांक - ७३१८, दंड रक्कम - ८३,०००
चालक क्रमांक - ८, दंड रक्कम - ७७,०००
चालक क्रमांक - १५९०१, दंड रक्कम - ४०,०००
चालक क्रमांक - १७०९९, दंड रक्कम - ३६,०००
चालक क्रमांक - ४३५३५, दंड रक्कम - ४१,०००
चालक क्रमांक - ४७१६४, दंड रक्कम - १,१६,०००
चालक क्रमांक - ५०३६१, दंड रक्कम - ५०,०००
चालक क्रमांक - ५५९७३, दंड रक्कम - ५८,०००
चालक क्रमांक ८००२००, दंड - ५५०००/
मुकुंद बापट (चालक) - विठ्ठलवाडी आगार, दंड - १,०२,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

