जलवाहतुकीचा भार एसटीवर

जलवाहतुकीचा भार एसटीवर

Published on

जलवाहतुकीचा भार एसटीवर
अलिबाग बसस्थानकात प्रवाशांच्या रांगा
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर)ः सुट्टीचा हंगाम संपल्यानंतर रविवारपासून (ता. २६) पर्यटक परतीच्या मार्गावर निघाले आहेत, पण पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जलवाहतूक बंद करण्यात आल्याने परतीच्या प्रवासासाठी अनेकांना एसटीचा आधार घ्यावा लागला आहे.
अलिबागसह वरसोली, नागाव समुद्रकिनारी पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. त्याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडीशी सामना करण्याची वेळ प्रवाशांसह पर्यटकांवर आली होती. प्रवासी बोटी बंद असल्याने एसटीच्या सेवेवर त्याचा भार पडला. अलिबाग एसटीस्थानकात तिकीट काढण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. वाढलेल्या गर्दीचा विचार करता, अलिबाग एसटी आगाराने जादा बसेसची व्यवस्था केली होती, परंतु वाहतूक कोंडीमुळे अनेक बस कोंडीत अडकल्यामुळे निश्चित स्थळी वेळेवर पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे अलिबाग स्थानकातून बस उशिरा सुटत असल्याने पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Marathi News Esakal
www.esakal.com