अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
रोहा, ता. २७ (बातमीदार)ः तालुक्यात वादळी वाऱ्यासहित कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे धानाची मोत्यासारखी कणसं चिखलात गाढली. कापणी केलेले पीक त्याची करपे पावसात भिजल्याने मोड आले. साठवलेले धान्य ओलाव्याने नासधूस झाल्याने बळीराजा चिंतित आहे.
रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे, धामणसई भागातील शेतीला परतीच्या पावसाने पार झोडपून काढले आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीत सोन्यासारखे पिकलेले पीक अक्षरशः चिखलात आडवे पडले आहे. काही पिकांची पूर्णतः नासाडीमुळे भात खरेदी-विक्री सोडाच, मात्र त्यांच्या कुटुंबांवर उपासमारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे केले मात्र अद्याप त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. सरकारकडून नुकसानभरपाई जाहीर होईल, अशी अपेक्षा असली तरी अद्याप प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल आहे.

