कांदळवनासह पाणथळ क्षेत्र संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम

कांदळवनासह पाणथळ क्षेत्र संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम

Published on

कांदळवनासह पाणथळ क्षेत्र संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम
नेरूळ, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबईतील कांदळवनासह पाणथळ क्षेत्र संवर्धनासाठी नवी मुंबई, मुंबई, पनवेल व पालघर येथील सामाजिक संस्‍थांकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याला स्‍थानिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नेरूळ सीवूड्स परिसरातील चाणक्य तलाव आणि डीपीएस तलावाला मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षित क्षेत्राचा दर्जा दिला आहे. या परिसरातील कांदळवन आणि पाणथळ जागा जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून फ्लेमिंगोंसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचा हा प्रमुख अधिवास मानला जातो. तथापि, सिडकोकडून कांदळवन आरक्षण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून, पर्यावरणप्रेमींमध्ये याविरोधात संतापाची भावना वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था आणि पर्यावरण संवर्धकांनी एकत्र येत मागील पाच वर्षांपासून या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविली आहे. एन्व्हायरमेंट लाइफ फाउंडेशनच्या पुढाकाराने चालणारी ही मोहीम एकही आठवडा न चुकता दररविवारी सकाळी घेण्यात येते. नुकताच या मोहिमेचा २७०वा टप्पा पूर्ण झाला असून, हे नवी मुंबईतील सर्वात मोठे आणि सातत्यपूर्ण पर्यावरण उपक्रमांपैकी एक ठरले आहे. कांदळवनात साचणारा प्लॅस्टिक, थर्माकोल, घरगुती कचरा, दारूच्या बाटल्या आणि बांधकामातील वेस्ट यामुळे पाणथळ जागांचे मोठे नुकसान होत आहे. जैवविविधतेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. तसेच पक्ष्यांच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. याच धोक्याची जाणीव ठेवून हजारो नागरिकांनी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग नोंदवत आतापर्यंत हजार टनांहून अधिक कचरा संकलित केला आहे. या अभियानाला मुंबई-नवी मुंबईसोबत पनवेल, पालघर येथील पर्यावरणप्रेमींचा आणि विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. वनशक्ती, वसुंधरा अभियान, निर्धार फाउंडेशन, विसपुते कॉलेज, रहेजा हॉटेल मॅनेजमेंट, सोमय्या कॉलेज आदी संस्थांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग दिला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग हा पर्यावरणाबद्दलची सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com