प्रतिभावंत नाटककाराला मुकलो ः मुख्यमंत्री
प्रतिभावंत नाटककाराला मुकलो ः मुख्यमंत्री
मुंबई, ता. २८ ः मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ‘वस्त्रहरण’ या विक्रमी नाटकासह इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला गवाणकर यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘‘अभिजात मराठीचे सौंदर्य आणि सौष्ठव मालवणी बोली आणखी ठसठशीतपणे मांडते. अशा या मालवणीची नादमाधुर्यता आणि तिचा ठसका गवाणकर यांनी आपल्या नाट्यकृतींतून जगभर पोहोचविला. त्यांच्या इतर नाट्यकृतीदेखील वेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन राहिल्या आहेत. पौराणिक ढाच्यातील ‘वस्त्रहरण’ वर्तमानातील चपखल संदर्भ घेत आजही महाविक्रमी वाटचाल करीत आहे, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी, कला-साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. गवाणकर कुटुंबीय, मराठी रंगभूमी चळवळ, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना हा आघात सहन करण्याची क्षमता मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

