परिवहन उपक्रमाला संजीवनी
परिवहन उपक्रमाला संजीवनी
वाशी बस डेपो नूतनीकरणातून २४ कोटी मिळणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः एनएमएमटीच्या वाशी बस डेपोच्या जागेवर उभे राहिलेले वाणिज्य संकुल टीप टॉप इंटरनॅशनल कंपनीने १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले आहे. या माध्यमातून वर्षाकाठी मिळणाऱ्या २४ कोटींच्या उत्पन्नातून पालिकेच्या परिवहन उपक्रमाला नवी संजीवनी मिळाली आहे.
वाशी येथे विष्णूदास भावे नाट्यगृहासमोरच्या भूखंडावर महापालिकेने २१ मजली इमारत तयार केली आहे. या इमारतीमध्ये वाणिज्य गाळे भाड्याने देऊन उत्पन्नाच्या माध्यमातून महापालिका परिवहन उपक्रम जगवण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. याकरिता एनएमएमटी प्रशासनाने नाईट फ्रॅंक प्रा.लि. परदेशी कंपनीला सल्लागार म्हणून नेमले आहे. या उपक्रमातून वाशी बस आगाराप्रमाणे अन्य बस आगारांचा विकास केला जाणार आहे. वाणिज्य संकुले उभारून त्यात परिवहन उपक्रमाला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच ही इमारत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातर्फे एमएमएमटी प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आली आहे; पण प्रत्यक्षात इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पालिकेचा बस डेपो सुरू होणार आहे.
------------------------------
निवडणुकीआधी लोकार्पण
परिवहन उपक्रमाची आर्थिक परिस्थिती डेपोचा विकास करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे महापालिकेतर्फे परिवहन उपक्रमाला अनुदान दिले गेले आहे. यातून ही इमारत उभी राहिली आहे; पण वर्षभरापासून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत सजावट आणि महावितरणच्या संबंधित कामामुळे इमारतीचे लोकार्पण थांबले आहे. आता सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिका निवडणुकीआधी इमारतीचे लोकार्पण होईल, अशी अपेक्षा आहे.
--------------------------------
अत्याधुनिक सुविधांची गरज
वाशीतील एनएमएमटीच्या बस डेपोतून मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, पालघर, नालासोपारा, नवी मुंबई, पनवेल, उरण अशा सर्व ठिकाणी पालिकेच्या परिवहन उपक्रमातील बस जातात. या बस डेपोत इतर महापालिकांच्या परिवहन सेवेतील बससाठी थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्या तुलनेत सुविधा देण्यात येत नाहीत.
---------------------------------------
वाणिज्य संकुलाची रचना
- वाशी सेक्टर ९ ए
- २३ माळ्यांचे भव्य वाणिज्य संकुल
- १६० कोटींचा खर्च अपेक्षित
- प्रत्यक्षात १९० कोटींचा खर्च
- १० हजार ३०० चौरस मीटर जागेवर दीड लाख चौरस फुटाचे बांधकाम
- वाणिज्य संकुलातून एनएमएमटीला वर्षाला २४ कोटींचे उत्पन्न
- वातानुकूलित आसन व्यवस्था
- बस वेळापत्रकासाठी स्मार्ट टीव्ही बोर्ड
- सुनियोजित पार्किंग, स्वच्छतागृह, सुसज्ज भोजनालय
- आराम कक्ष
----------------------------------
मिळणारे उत्पन्न
- टीप टॉप इंटरनॅशनल - वर्षाला २४ कोटी
- दहा वर्षांसाठी करार
- दर तीन वर्षांनी १५ टक्के वाढ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

