राजकीय बॅनर्सनी मुंबई विद्रुप
राजकीय बॅनर्सनी मुंबई विद्रूप
कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या काळात शहरात ठिकठिकाणी लावलेले धार्मिक बॅनर, पोस्टर अजूनही पूर्णपणे उतरलेले नाहीत. तोच आता पुन्हा मुंबई राजकीय बॅनर्स आणि पोस्टरांनी गच्च भरली आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार दिलेल्या सूचना आणि इशाऱ्यानंतरही शहरात अवैधरीत्या बॅनर, पोस्टर लावण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या या नव्या राजकीय बॅनरवर कुठेही क्यूआर कोड दिसत नाही. पालिकेकडून परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या बॅनरवर क्यूआर कोड बंधनकारक असतो. या कोडमध्ये बॅनर लावणाऱ्याचे नाव, जागेची माहिती आणि परवानगी कालावधी याची सविस्तर माहिती असते; मात्र बहुतांश बॅनर अनधिकृत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
छटपूजेच्या निमित्ताने तसेच राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांचे बॅनर मुंबईबाहेर झळकत आहेत. पालिकेच्या जाहिरात आणि होर्डिंग विभागावरच अवैध बॅनर, पोस्टर हटवण्याची जबाबदारी आहे; पण संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा अवैध बॅनर, पोस्टरविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत; मात्र तरीही राजकीय पक्षांकडून अवैधरीत्या बॅनर लावण्याचे प्रकार कमी झालेले नाही. सध्या मुंबईच्या विविध भागात राजकीय तसेच धार्मिक बॅनर्सवर अद्याप कारवाई झालेली नसल्याची स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

