खालापुरात महायुतीला सुरुंग

खालापुरात महायुतीला सुरुंग

Published on

खालापुरात महायुतीला सुरुंग
खासदार सुनील तटकरे यांचे अप्रत्यक्ष संकेत
खालापूर, ता. २९ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात महायुतीत राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे शिवसेना एकत्र निवडणूक रिंगणात नसणार आहे. खोपोली दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. त्यामुळे निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.
राज्यात सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये खालापूर तालुक्यात एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला गेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे तीन आमदार विरुद्ध तटकरे एकमेकांसमोर दंड थोपटून आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेले दोन्ही पक्ष जिल्ह्यात मात्र कुरघोडीचे राजकारण करीत आहेत. कर्जतचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात विधानसभेला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पडद्याआडून सुधाकर घारे यांना पाठबळ दिले. यामुळे दोन्ही पक्षात संबंध ताणले गेले. अटीतटीच्या लढतीत निसटता विजय थोरवे यांनी मिळविला; मात्र थोरवे यांनी दंड थोपटून तटकरे कुटुंबाला सातत्याने लक्ष्य केले आहे.
-----------------------
कुरघोडीचे राजकारण
- राष्ट्रवादी काँग्रेसने सुधाकर घारे यांना जिल्ह्याध्यक्षपद देताना पुनर्वसन केले. आमदार थोरवे यांना रोखण्यासाठी ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. अशातच खोपोली दौऱ्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या जागा वाटपाच्या सूत्राची खिल्ली उडवली.
- जिल्ह्यात शिंदे शिवसेना सोडून इतर राजकीय पार्टीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस सूत जुळवणार असून आमदार थोरवेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गट, मनसेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक वाढली आहे. त्यामुळे खालापूर तालुक्यातून महायुती दुभंगण्याची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com