टिळक रोडचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु

टिळक रोडचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु

Published on

टिळक रोडचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू
डोंबिवलीतील मुख्य रस्ता खड्डेमुक्त होणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेल्या डोंबिवलीमधील मुख्य रस्ता आता खड्डेमुक्त होणार आहे. टिळक रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व्हेश सभागृह ते मदन ठाकरे चौक या टप्प्यातील काम सोमवार (ता. २७)पासून हाती घेण्यात आले. हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असल्याने नागरिक कामावर समाधान व्यक्त करीत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. बाहेरून शहरात स्थानक परिसरात येणारी सर्व वाहने वाहतुकीसाठी या मार्गाचा अवलंब करतात. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. गेल्या दोन वर्षांपासून तर रस्त्याची आणखीनच बिकट अवस्था झाली होती. यानुसार या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. यानुसार अखेर या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तरी हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद न ठेवण्याचा निर्णय डोंबिवली वाहतूक विभागाने घेतला आहे.
टिळक रोडकडून स्थानकाकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवली आहे. दिवाळीपूर्वी गेल्या आठवड्यात लोकमान्य टिळक पुतळा, कारवा रुग्णालय, सर्वेश सभागह, ब्राह्मण सभा ते फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौक रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार होते; परंतु दिवाळी काळात हा रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी खोदला तर वाहतूक कोंडीचा फटका शहरवासीयांना बसेल म्हणून ही कामे दिवाळीनंतर करण्याचे निश्चित केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याकडेला खडी टाकून ठेवली होती; मात्र रस्ते कामास सुरुवात होत नसल्याने हे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. अखेर कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अशी आहे पर्यायी वाहतूक व्यवस्था
रविवार-सोमवारपासून फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकापासून रस्त्याची डावी मार्गिका खोदण्यास सुरू केली. ही मार्गिका सर्व्हेश सभागृहापर्यंत खोदण्यात येत आहे. कामाच्या पहिल्या टप्प्यात डावी मार्गिका तर दुसऱ्या टप्प्यात उजव्या मालिकेचे काम करण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकाकडून टिळक पुतळ्याकडे जाणारी वाहने डावी मार्गिका पूर्ण होईपर्यत पी. पी. चेंबर्स, भगतसिंह रस्ता, कारवा रुग्णालय ते टिळक चौक, फडके रस्ता, सावरकर रस्ता, नेहरू रस्ता, चार रस्त्याने टिळक पुतळ्याकडून इच्छित ठिकाणी धावतील, असे वाहतूक विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com