कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पास गती मिळण्यासाठी केडीएमसीत बैठकीचे आयोजन

कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पास गती मिळण्यासाठी केडीएमसीत बैठकीचे आयोजन

Published on

कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पाला गती
आयुक्तांची उच्चस्तरीय बैठक; अडथळे दूर करून कामाला वेग देण्याचे निर्देश
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : कल्याण स्थानक सॅटिस प्रकल्पास गती मिळण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, वाहतूक विभाग, शहर अभियंता अनिता परदेशी, परिवहन व्यवस्थापक विजयकुमार द्वासे, उपायुक्त समीर भूमकर, संदीप तांबे, मराविमचे कार्यकारी अभियंता व अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे इतर अधिकारी आणि आरटीओ‍, एमएसआरसीटीसी आदी प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्प कार्यान्वित होण्याकामी भेडसावणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. सुभाष चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणात बाधित ऑप्टिकल इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या ठिकाणचे आवश्यक क्षेत्र महापालिकेस प्राप्त झालेले नाही. परिणामी, सुभाष चौकाकडील उड्डाणपुलाच्या उताराच्या कामास विलंब होत आहे. त्यामुळे कल्याण स्थानकाकडील सुभाष चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुख्य रस्त्याकडील परळीकर मार्गापासून रामबाग रस्त्यावरून सुभाष चौकापर्यंत वनवे केल्यास उड्डाणपुलाच्या उताराच्या रिटेनिंग वॉलचे काम सुरू होऊ शकते, असा प्रस्ताव या बैठकीत मांडला असता त्यावर चर्चा होऊन बुधवारी (ता. ५) वाहतूक विभागामार्फत अधिसूचना काढून कामास सुरुवात करावी, अशा सूचना अभिनव गोयल यांनी दिल्या.

बसेस दुर्गाडी येथून मार्गस्थ होणार
सॅटिस प्रकल्पांतर्गत एमएसआरटीसीच्या इमारतीचे काम सुरू आहे. या एमएसआरटीसीच्या बसची वाहतूक अद्याप कल्याण बस स्थानकातून होत असल्याने स्थानकाचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथील बस वाहतूक दुर्गाडी येथून करण्याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील अद्यापपर्यंत कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बुधवारपासून लांब पल्ल्याच्या आणि रबाळे, पनवेल, भिवंडी येथे जाणाऱ्या सर्व बस दुर्गाडी येथून मार्गस्थ होतील, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com