आधी कचऱ्याच्या गाड्यांचे नियोजन करून मगच इतर उपक्रम राबवा - मोहन उगले

आधी कचऱ्याच्या गाड्यांचे नियोजन करून मगच इतर उपक्रम राबवा - मोहन उगले

Published on

महापालिकेच्या नव्या कचरा संकलन कार्यपद्धतीवर मोहन उगलेंचा तीव्र संताप
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोणत्या दिवशी कोणता कचरा संकलित करणार याबाबतच्या सूचना एका तक्त्याद्वारे दिल्या आहेत. मात्र पलिकेच्या नव्या कार्यप्रणालीवर शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी टीका केली आहे. आधी शहरात रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या गाड्यांचे नियोजन करून मगच कचऱ्याच्या बाबतीत इतर उपक्रम राबविण्याची मागणी उगले यांनी आयुक्तांकडे केली आहे.
उगले म्हणाले, की पालिका मुकादम यांनी एक चार्ट पाठवलेला आहे. कुठल्या दिवशी काय कचरा द्यायचा. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिक ९५० रुपये अतिरिक्त भार कचऱ्याचा देत आहेत. असे असताना शहरामध्ये सर्व ठिकाणी जो कचरा दिसत आहे आणि ज्या कचऱ्याच्या गाड्या रस्त्यावर पडलेल्या आहेत त्याचे पहिले नियोजन करा. त्यानंतर बाकीच्या गोष्टी वास्तवात उतरवायचा प्रयत्न करा, अशी मागणी मोहन उगले यांनी केली आहे.
आधी शहरामध्ये चार बाय सहाच्या कचराकुंड्या होत्या. नागरिक त्यामध्ये कचरा टाकत होते. परंतु घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी या कचराकुंड्या हटविल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असून, वीस बाय पंचवीस एवढा कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांना सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असून आधी उपलब्ध असलेल्या कचऱ्याच्या गाड्यांचे योग्य नियोजन करून मग नागरिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या दिवशी संकलित करण्याचा उपक्रम लादावा, अशी मागणी मोहन उगले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com