चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

Published on

चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प
रायगड जिल्ह्यातील सुमारे तीन हजार बोटी किनाऱ्यावर
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सुमारे तीन हजार बोटी समुद्रकिनाऱ्यावर परत आल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण ३,५०० मासेमारी बोटी नोंदणीकृत असून, यापैकी बहुतेक बोटी सध्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. उर्वरित बोटींच्या सुरक्षित परतीसाठीही प्रशासन आणि बंदर विभाग सतत संपर्कात आहे. चक्रीवादळाचा इशारा मिळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, स्थानिक ग्रामपंचायती, सागरी सुरक्षा पथक आणि पोलिस दल यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे सागरी लाटांची तीव्रता वाढल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रातील मासेमारी पूर्णपणे थांबवली असून, किनाऱ्यावरील गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
............
चौकट :
मच्छीमार बांधव आर्थिक संकटात
यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने मच्छीमार बांधवांना मासेमारी लवकरच बंद करावी लागली. त्यानंतरही अनेकदा वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प होती. यामुळे मच्छीमार बांधवांचा हंगाम वाया गेला असून, ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
...............
चौकट :
ताजी मासळी नसल्याने खवय्यांचे वांधे
गेले काही दिवस खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्याला लावल्या आहेत. त्यामुळे ताजी मासळी बाजारातून गायब झाली आहे. यामुळे खवय्ये व पर्यटकांचे वांधे झाले आहेत.
..............
प्रतिक्रिया :
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बोटींची नोंद घेण्यात आली असून, मच्छीमारांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाच्या पुढील सूचना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.
- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com