सरसोळे बस आगारात बेकादाय पार्किंग

सरसोळे बस आगारात बेकादाय पार्किंग

Published on

सरसोळे बस आगारात बेकायदा पार्किंग
सुरक्षा रक्षक गायब; नागरिकांची तीव्र नाराजी
जुईनगर, ता. ३० (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर १२ मधील सरसोळे बस आगार हे बेकायदा पार्किंग स्थळ बनले आहे. यामुळे प्रवासी आणि वाहनचालक दोघांनाही प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चारचाकी वाहनांपासून टेम्पो आणि ट्रकपर्यंत सर्व प्रकारची वाहने या आगारात खुलेआम उभी केली जात असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या आगारातून सध्या एकूण पाच बसमार्ग चालतात. त्यामुळे दररोज शेकडो प्रवासी या ठिकाणी ये-जा करतात; मात्र जागोजागी उभ्या केलेल्या खासगी वाहनांमुळे बसला आगारात प्रवेश करण्यासही अडचण येते. परिणामी, बस वेळेवर ये-जा करू शकत नाहीत, तसेच प्रवाशांना बस पकडताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. इतकेच नव्हे, तर आगारातील या अव्यवस्थेमुळे अपघाताची शक्यताही कायम असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते, ज्यामुळे आगारात वाहन पार्किंगवर नियंत्रण होते; मात्र सध्या हे रक्षक गायब झाल्याने पुन्हा एकदा बेकायदा पार्किंग सुरू असल्याचे बोलले जात आहे. आगारात उभ्या वाहनांमुळे बसपर्यंत पोहोचण्यासाठीच धडपड करावी लागते. कोणते वाहन कोणत्या दिशेने अचानक येईल, याचा अंदाज लागत नाही, असे प्रवाशांनी सांगितले. प्रवाशांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करून आगारातील बेकायदा वाहनतळ हटवण्याची, तसेच पुन्हा सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. सरसोळे आगारातील ही अराजकता कायम राहिल्यास प्रवासी संघटनांकडून ठोस आंदोलन उभारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com