सुक्या मासळीचा हंगाम संकटात

सुक्या मासळीचा हंगाम संकटात

Published on

सुक्या मासळीचा हंगाम संकटात
अवकाळी पावसामुळे वाळवणात अडचणी
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : अवकाळी पावसाने बळीराजाबरोबर आता कोळीबांधवही संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणे धोक्याचे ठरत आहे. अशातच सुकलेल्या मासळीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही गदा आल्याने हंगाम वाया जाण्याची भीती आहे.
वर्षभरापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. त्यापाठोपाठ अवकाळी हजेरी लावल्याने किनारपट्टीच्या भागात सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. त्यामुळे सुकी मासळी विक्रीच्या हंगामातच लाखोंचे नुकसान झाले आहे. दसऱ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले की दारासमोरील अंगणात शिल्लक मच्छीचे वाळवण टाकले जाते. त्यात सुकट, जवळा, बोंबील, सोडे, कोळंबी, आंबाड, वाकटी, बांगड्याचा समावेश असतो. सुक्या मच्छीला चवीमुळे मागणीही अधिक असते. दरवर्षी लाखोंची उलाढाल सुक्या मच्छीच्या विक्रीतून होत असते. पण यंदा पावसाने अजून काढता पाय घेतलेला नसल्याने त्याचा परिणाम सुक्या मासळीच्या हंगामावर झाला आहे.
-------------------------------------
बदलत्या हवामानाचा परिणाम
- अवकाळी पावसामुळे नवी मुंबई, उरण भागातील सुक्या मच्छीची आवक घटली आहे. हवामानातील बदलांमुळे समुद्रातील पारंपरिक मासेमारीवर मर्यादा आल्या आहेत. यामुळे सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे.
- समुद्रातून मिळणाऱ्या माशांची आवक घटली आहे. परिणामी, सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे. या स्थितीमुळे उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे.
-----------------------------
सुक्या मासळीच्या हंगामाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सुकविण्यासाठी ठेवलेले बोंबील, जवळा भिजून खराब झाला आहे. सुकवलेली सुकी मच्छी बाजारात येण्याआधीच नष्ट झाली आहे.
- दीपाली गजणे, मासळी विक्रेत्या, दिवाळे कोळीवाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com