झटपट पैशांच्या मोहाचे बळी

झटपट पैशांच्या मोहाचे बळी

Published on

झटपट पैशांच्या मोहाचे बळी
सायबर चोरांचे उच्चशिक्षित सावज, नऊ महिन्यांत ७५ कोटींचा गंडा
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी नवी मुंबई शहरात नऊ महिन्यांत ७५ कोटींची रक्कम लाटली आहे. कमी वेळात जास्त नफा कमावण्याचा मोह उच्चशिक्षितांना लक्ष्य करीत आहे.
समाजमाध्यमांचा वापर करून नागरिकांना लुबाडण्याचे नवीन हत्यार सायबर गुन्हेगारांनी शोधले आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्रामवर जलद नफ्याच्या आकर्षक जाहिराती टाकून सावज शोधतात. जाहिरात पाहून संपर्क साधणाऱ्यांना व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी केले जाते. या ग्रुपमध्ये नफा मिळवलेल्या व्यक्तींचे बनावट चॅटिंग दाखवून विश्वास संपादन केला जातो. सुरुवातीला हजारांची गुंतवणूक करून थोडा नफा दाखवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर खोट्या ट्रेडिंग ॲपद्वारे मोठी रक्कम गुंतवायला भाग पाडले जाते. काही जण कर्ज काढून तर काही दागदागिने विकून कोट्यवधींची गुंतवणूक करतात. पैसे मिळवताना मात्र सायबर चोरटे संपर्क तोडून गायब होतात. बनावट ट्रेडिंग ॲपचा फसवणुकीसाठी वापर केला जातो. या ॲपवरील नफा पूर्णपणे खोटा असतो. प्रत्यक्षात नागरिकांची रक्कम बँक खात्यांमध्ये वळती करतात.
-------------------------------
गुन्ह्याचा कालावधी - ९ महिने
गुन्ह्यांची नोंद - १३२
फसवणूक - ७४ कोटी ६६ लाख
उघडकीस आलेले गुन्हे - ३५
गोठवलेली रक्कम - २३ कोटी ९६ लाख ४५ हजार
अटक आरोपी - ४६
-----------------------------------------
फसवणुकीच्या प्रमुख घटना
- नवी मुंबईतील कळंबोलीत ऑगस्टमध्ये डॉक्टरची तीन कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक
- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून महिला डॉक्टरची ११ लाखांची फसवणूक
- नेरूळमधील लेखापालाची तब्बल दोन कोटी तीन लाख उकळले
- खारघरमधील बांधकाम व्यावसायिकाला १४ कोटी ८९ लाखांचा गंडा
- खारघरमध्ये राहणाऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीची ५२ लाखांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com