पनवेल महापालिकेत १३४ पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू होणार

पनवेल महापालिकेत १३४ पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया सुरू होणार

Published on

पनवेल महापालिकेत १३४ पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया
पनवेल, ता. १ (बातमीदार) : पनवेल महापालिकेतील १३४ रिक्त पदांसाठी प्रशासनाने नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात शासनाकडे या भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे तो प्रस्ताव मागे घेण्यात आला असून, आता पुन्हा टीसीएस कंपनीमार्फत नवीन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
महापालिकेत सध्या १,३२६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ८२५ अधिकारी व कर्मचारी, तर ६७ शिक्षक आहेत. मागील भरती प्रक्रियेत ३७७ उमेदवारांची नियुक्ती झाली होती. मात्र अनेकांनी इतर ठिकाणी रुजू झाल्यामुळे १३४ पदे पुन्हा रिक्त राहिली आहेत. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी सामान्य प्रशासन विभागाला या भरतीसंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टीसीएस कंपनीकडून लागणाऱ्या खर्चाचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. लवकरच या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या रिक्त पदांपैकी सर्वाधिक म्हणजे ७६ पदे लिपिक-टंकलेखक संवर्गातील आहेत. त्याशिवाय कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, हार्डवेअर नेटवर्किंग), वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, परिचारिका, अग्निशमन कर्मचारी, वाहनचालक, माळी, सहाय्यक क्रीडा अधिकारी आणि लघुलेखक अशी विविध पदे रिक्त आहेत.
..................
कोट
पनवेल महापालिकेने सरळ सेवेमार्फत ३७७ पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्या काळात अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक परीक्षांमध्ये सहभाग घेतला होता. परिणामी काहींची निवड अनेक ठिकाणी झाली. अशा उमेदवारांनी सोयीच्या ठिकाणी नोकरीला प्राधान्य दिल्यामुळे ही पदे रिक्त राहिली. त्यामुळे या रिक्त पदांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- कैलास गावडे, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com