प्रवासी वाहनांना कामोठेत थांबा
प्रवासी वाहनांना कामोठेत थांबा
कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय
पनवेल, ता. २ (बातमीदार)ः सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल परिसरात खासगी चारचाकी, बसचालकांच्या मनमानी थांब्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मॅकडॉनल्डसमोर बस थांबवून प्रवासी चढविणे-उतरणे सुरू असल्याने प्रवासी वाहनांना तसेच इतर वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर कामोठे उड्डाणपुलाजवळील हा थांबा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कळंबोली हे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा येथे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी वाहनांची बारमाही वर्दळ असते. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या हजारो पट खासगी वाहनांचा वावर येथे असतो. त्यामुळे बेशिस्तीला लगाम लागावा तसेच प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून बसथांब्याचे स्थलांतर केले आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी हा निर्णय अमलात आणला आहे.
---------------------------------------
दोन स्वयंसेवक नेमणार
- नवीन ठिकाणी वाहतूक शिस्त राखण्यासाठी वाहतूक विभागाकडून दोन स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. बसचालकांनी नवीन ठिकाणीच थांबावे, हॉर्नचा गैरवापर टाळावा आणि प्रवासी घेतल्यानंतर तत्काळ पुढे निघावे, अशा सूचना मुंबई बस मालक संघटनेला दिल्या आहेत.
- कळंबोली कॉलनीजवळ पुन्हा बस थांबवल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, महामार्गावरील कोंडी काही प्रमाणात सुटेल, अशी आशा आहे.
---------------------------
निर्णयाचा फायदा
अवाजवी भाडे वसुलीवर नियंत्रण
बसचालकांच्या गैरवर्तणुकीला लगाम
इतर वाहनांना अडथळा निर्माण करणे
----------------------------------
हॉटेल, टपरीधारक अडचणीत
कळंबोली सर्कल परिसरात असलेला खासगी बसथांबा कामोठे उड्डाणपुलाजवळ स्थलांतरित केल्याचा फटका स्थानिक हॉटेलधारकांना बसणार आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ४० ते ५० लहान-मोठ्या हॉटेल्स, टपऱ्या, चहा-नाश्त्याचे स्टॉल आणि प्रवाशांसाठी किरकोळ वस्तूंची दुकाने सुरू आहेत. सकाळपासून रात्रभर या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ असते, मात्र बसथांबा कामोठेला गेल्यानंतर त्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

