निळजे उड्डाणपूलाची पुर्नंबाधणी होणार

निळजे उड्डाणपूलाची पुर्नंबाधणी होणार

Published on

निळजे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी होणार
शुक्रवारपासून कल्याण शिळ रोडवरील वाहतुकीत बदल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिल्ली ते जेएनपीटी या फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसीच्या डबल कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे हा जुना उड्डाणपूल तोडून नव्याने त्याची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम राज्य महामार्ग क्र. ७६ लोढा पलावा एक्सपेरिया मॉल जवळ कल्याणहून शिळफाटाकडे जाणाऱ्या वाहिनीवर होणार आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे ओव्हर ब्रिजची उंची कमी असल्याने तो तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून, ७ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण शिळ रोडवरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.

नवी मुंबईसह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहतूक बदल
१ कल्याणकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण शीळ रोड, निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने निळजे कमानीजवळून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावाकडून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरून महालक्ष्मी हॉटेलपर्यंत पुढे इच्छीतस्थळी जातील.

२ लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन, एक्सपिरिया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे ब्रिज चढणीला, एक्सपिरिया मॉल बाजूला कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवर प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने कल्याण शिळ रोडने शिळफाट्याचे दिशेने जाऊन देसाई खाडी पूल पार करून सरस्वती टेक्सटाईल समोरून उजवीकडे वळण (यू टर्न) घेऊन नवीन पलावा उड्डाणपुलावरून इच्छितस्थळी जातील.

३ मुंब्रा, कल्याण फाट्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सहाचाकी व जड-अवजड वाहनांना मुंब्रा वाहतूक उपविभागाच्या हद्दीत कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने कल्याण फाटा-शिळफाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका मागे इच्छीतस्थळी जातील.

४ कल्याणकडून मुंब्रा कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सहाचाकी, जड-अवजड वाहनांना काटई चौक (बदलापूर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने काटई चौक (बदलापूर चौक)-खोणी नाका-तळोजा एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जातील.

५ अंबरनाथ, बदलापूरकडून पाइपलाइन रोडने काटई चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथून डावीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छितस्थळी जातील.

हलके वाहन पर्यायी मार्ग ः
१ नवी मुंबई, मुंबईकडून कल्याण फाटा (मुंब्रा) मार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कार, मोटारसायकलस्वारांनी कल्याण फाटा-शिळफाटा-दिवा-आगासन फाटक-दिवा संदप रोड-मानपाडा, कल्याण शिळ रोड या मार्गांचा वापर करावा.

२ मुंबई-ठाण्याकडून कल्याण फाटा (मुंब्रा) मार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कार, मोटारसायकलस्वार यांनी नाशिक मुंबई महामार्ग-मानकोली मोठागाव-डोंबिवली या मार्गाचा किंवा नाशिक मुंबई महामार्ग रांजनोली बायपास कोनगाव कल्याण या मार्गाचा वापर करावा.

३ कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरकडून नवी मुंबई, मुंबई दिशेने जाणाऱ्या कार, मोटारसायकलस्वार यांनी चक्कीनाका श्री मलंग रोड नेवाळी नाका उजवीकडे वळून बदलापूर पाइपलाइन रोड-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गाचा वापर करावा.

पनवेल, नवी मुंबईकडून महापे नवी मुंबईमार्गे कल्याण फाटा जंक्शन किंवा शिळफाटा जंक्शन येथे जड-अवजड वाहने कल्याण फाटा जंक्शन-शिळफाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका या मार्गाचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com