पावसाने उद्धवस्त शेतकऱ्यांची थट्टा

पावसाने उद्धवस्त शेतकऱ्यांची थट्टा

Published on

पावसाने उद्ध्वस्त शेतकऱ्यांची थट्टा
नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी विभागाची दिरंगाई
उरण, ता. ५ (वार्ताहर)ः अवकाळी पावसामुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. भातपीक गमावल्याने शेतकरी मदतीची आस लावून बसला आहे, मात्र संकटकाळात सहकार्य करण्याऐवजी उरण तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे.
मराठवाड्यानंतर अवकाळी पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे. कापण्यासाठी तयार झालेले भातपीक शेतीत पाणी तुंबल्याने चिखल झाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे पिकाची काढणी कठीण झाली आहे. अनेक ठिकाणी भातपिकाच्या लोंब्याना अंकुर फुटल्याने हाती आलेले पीक नामशेष झाले आहे. या अस्मानी संकटात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे शासकीय आदेश दिले गेले आहेत, पण कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनाप्रमाणे पंचनामे करून शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे. उरणमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी कृषी खात्याचे अधिकारी एका ठिकाणी बसून सोपस्कार करत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभाराविरोधात संतापाचे वातावरण आहे.
---------------------------------------
अधिकाऱ्यांना घरी बसवा
भातशेती परवडत नसतानाही उरण पूर्व विभागातील अनेक शेतकरी भातशेती करीत आहेत, पण पावसाच्या अवकृपेने खाडी विभागातील शेतीबरोबरच डोंगर पट्ट्यातील भातशेतीचे अक्षरशः मातेरे केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांना घरी बसवा, असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
----------------------------------------
अवकाळी पावसाच्या संकटाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. पंचनामे करण्याचे आदेश आल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत.
- अर्चना सूळ, तालुका कृषी अधिकारी
----------------------------------------
पावसाच्या लहरीपणामुळे भातपीक पूर्णतः नामशेष झाले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आहे. भाताचा पेंढा कुजून गेल्याने गाय-बैलांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कुठलेही नियमांशिवास सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी.
- चंद्रकांत तांडेल, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com