डोंबिवलीत “वन ॲप वन तिकीट” सुविधा

डोंबिवलीत “वन ॲप वन तिकीट” सुविधा

Published on

डोंबिवलीत ‘वन ॲप वन तिकीट’ सुविधा
रेल्वे, बस, मेट्रोचा प्रवास आता एका क्लिकवर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाचा वन ॲप वन तिकीट उपक्रम प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे. या ॲपवरील क्यूआर कोड स्कॅन करताच प्रवाशांना डोंबिवली ते मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही ठिकाणचे रेल्वे, बस व मेट्रोचे तिकीट काही मिनिटांत ऑनलाइन उपलब्ध होते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावरील अथवा बस व मेट्रो स्थानकावरील तिकिटाच्या रांगा टाळता येतात.
डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात केडीएमटी बस नियंत्रक चौकीजवळ वन ॲप वन तिकीट यंत्र बसविले आहे. या ॲपवरील क्यूआर कोड स्कॅन करताच प्रवाशांना डोंबिवली ते मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही ठिकाणचे रेल्वे, बस व मेट्रोचे तिकीट काही मिनिटांत ऑनलाइन उपलब्ध होते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकांवरील अथवा बस व मेट्रो स्थानकांवरील तिकिटाच्या रांगा टाळता येतात.
या सुविधेमुळे प्रवासी एका तिकिटावर रेल्वे, बस आणि मेट्रो असा सलग प्रवास करू शकतात. डोंबिवली रेल्वे स्थानकावरून प्रवास करणारा नोकरदारवर्ग या सोयीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. यापूर्वी मुंबईत प्रवास करताना रेल्वेनंतर वेगवेगळ्या परिवहन सेवेची स्वतंत्र तिकिटे घ्यावी लागत होती. मात्र आता या उपक्रमामुळे एकाच ॲपवरून एकाच व्यवहारात सर्व प्रवासाचे तिकीट मिळते. या वन ॲप वन तिकीट उपक्रमामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सोयीस्कर, वेगवान आणि रांगेविना झाला आहे.

एकत्रित तिकीट तत्काळ उपलब्ध
डोंबिवलीतील केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, दररोज शेकडो प्रवासी या सुविधेचा वापर करीत आहेत. उदाहरणार्थ एका प्रवाशाने डोंबिवली ते कांदिवली प्रवासाचे तिकीट या ॲपद्वारे घेतले असता त्याला ५१ रुपयांचे एकत्रित तिकीट तत्काळ उपलब्ध झाले. व्यवहार ऑनलाइन पूर्ण होत असून, बसमधील वाहक क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट पडताळतो.

Marathi News Esakal
www.esakal.com