कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेची नवी झेप

कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेची नवी झेप

Published on

कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेची नवी झेप
वॅगनची वहनक्षमतेत ५० वरून ५७ टनांपर्यंत वाढ
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : कोकण रेल्वेच्या ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (रो-रो) सेवेला नवीन झेप मिळाली आहे. मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वॅगनची वहनक्षमता ५० टनांवरून ५७ टनांपर्यंत वाढवली आहे.

१९९९ मध्ये सुरू झालेली ‘रो-रो’ सेवा ही कोकण रेल्वेची एक आगळीवेगळी आणि किफायतशीर वाहतूक योजना आहे. या सेवेअंतर्गत मालवाहू ट्रक थेट रेल्वे वॅगनवर चढवून नेले जातात. त्यामुळे इंधन बचत, चालकांचा थकवा, रस्त्यांवरील गर्दी आणि प्रदूषण यामध्ये मोठी घट होते. नवीन क्षमतेनुसार एका ‘रो-रो’ रेकमध्ये एकूण ५० वॅगन असतील. त्यापैकी १५ बीआरएन वॅगन प्रत्येकी ५७ टन वजनाचे ट्रक वाहून नेऊ शकतील, तर उर्वरित ३५ बॉक्सएन वॅगन प्रत्येकी ५० टनांपर्यंतचे ट्रक वाहून नेण्यासाठी सक्षम असतील. ५७ टन क्षमतेच्या नव्या वॅगनसह पहिली ‘रो-रो’ सेवा बुधवार (ता. ५)पासून सुरू करण्यात आली आहे.

जड वाहन वाहतुकीत वाढ
रो-रो सेवेच्या क्षमता वाढीमुळे जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीस अधिक लवचिकता मिळणार आहे. विशेषतः लोखंड-स्टील, टाइल्स, मार्बल, बांधकाम साहित्य आणि इतर जड मालवाहतूक करणाऱ्या उद्योगांना या सुधारणेचा मोठा फायदा होणार आहे. ५० टनांपेक्षा जास्त वजनाचे ट्रक वाहतूक करू इच्छिणाऱ्या ट्रकचालकांनी कोलाड (९००४४७६०९०) किंवा सुरथकल (९६८६६५६१५९) येथील आरक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कोकण रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com