नवी मुंबई विमानतळाला अपोलो रुग्णालय सेवा देणार
नवी मुंबई विमानतळाला अपोलो रुग्णालय देणार सेवा
एनएमआयएएलसोबत सामंजस्य करार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (प्रा.) लि. ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए)ची ऑपरेटर आणि मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स यांच्यात सामंजस्य (एमओयू) करार झाला आहे. याअंतर्गत विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी व प्रवाशांसाठी दिवस-रात्र आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. यामुळे विमानतळावरील कामकाज सुरू होण्यापूर्वी एनएमआयएची आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद क्षमता वाढवणारा आहे.
एनएमआयएपासून जवळ असलेले मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या ठिकाणातील प्रगत बहुविशेष आरोग्यसेवा संस्था आहे. या करारांतर्गत हॉस्पिटल टर्मिनल १ येथे २४ x ७ वैद्यकीय केंद्र स्थापित करण्यास मदत करेल. हे केंद्र आपत्कालीन वैद्यकीय साह्य आणि आपत्ती व्यवस्थापन सुविधांसह सुसज्ज असेल. या केंद्रामध्ये तीन डॉक्टर, आठ नर्सिंग स्टाफ आणि दोन वाहनचालक यांचा समावेश असेल. अत्यंत कुशल टीम असेल, जी सतत वैद्यकीय तपासणीसाठी सुसज्ज असेल. सर्व वैद्यकीय कर्मचारी ॲडव्हान्स्ड कार्डिओव्हस्कुलर लाइफ सपोर्ट (एसीएलएस) प्रमाणित असतील. यामधून एनएमआयएमध्ये क्रिटिकल केअरच्या सर्वोच्च दर्जाची सुविधा मिळणार आहे. एनएमआयएमध्ये दोन पूर्णपणे सुसज्ज इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) रुग्णवाहिकादेखील असतील. या साइटवर तैनात असतील आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असतील. याव्यतिरिक्त हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद मदत देण्यासाठी टर्मिनल्सवर ६५ ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर्स (एईडी) धोरणात्मकरीत्या स्थापित केले जातील.
-------------------------------------
विमानतळावरील कामकाजापूर्वी टर्मिनल १ येथील वैद्यकीय केंद्र दिवस-रात्र आपत्कालीन आणि आपत्ती प्रतिसाद सहाय्य प्रदान करेल.
सतत वैद्यकीय तयारी सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि चालकासह एसीएलएसप्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकांची टीम उपलब्ध असेल.
विमानतळावर जलद प्रतिसाद आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी दोन ऑन-साइट आयसीयू रुग्णवाहिका आणि ६५ एईडी आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

