उरण-पनवेल मार्गावर धोका

उरण-पनवेल मार्गावर धोका

Published on

उरण-पनवेल मार्गावर धोका
रस्त्याच्या खोदकामामुळे अपघाताची शक्यता
उरण, ता. ८ (वार्ताहर) ः उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पूल ते कोट नाकादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खोदलेला रस्ता धोकादायक बनला असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
उरण-पनवेल मार्गांवरील बोकडवीरा पूल ते कोट नाकापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या मार्गावर एका बाजूने खडी टाकण्यात आली आहे; मात्र दुसऱ्या बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारामुळे समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com