थोडक्यात बातम्या नवी मुंबई
ज्येष्ठ नागरिक भवनसाठी सहकार्याचे आवाहन
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा येथे ज्येष्ठ नागगरिक भवन आणि गणपती मंदिर उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवक शंकर माटे याने आहे. सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात आनंद मेळावा पार पडला. या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. शिवाय सानपाड्यामध्ये ज्येष्ठ नागरिक भवन असावे तसेच गणपती मंदिर उभारावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. शिवाय गणपती मंदिर उभारणीसाठी रविवार (ता.९) आयोजित सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्य तडीस घेऊन जाण्याचा संकल्प करावा. तसेच या कार्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे माटे यांनी सूचित केले. तसेच माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी देखील याबाबत पुढाकार घेतला असून सानपाडा विभागातील जनेतला या दोन्ही कार्यात सहभाग घेण्यासाठी साकडे घातले आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सचिव शरद पाटील, खजिनदार विष्णुदास मुखेकर उपस्थित होते.
..............
विवेकानंद शाळेत पर्यावरण मार्गदर्शन
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा येथील विवेकानंद संकूल शाळेत नुकतेच पर्यावरण विषयक मार्गदर्शन पार पडले. शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे विद्यार्थी आणि पालकांसाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून पर्यावरणप्रेमी आबा रणवरे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित पालकांना रणवरे यांनी पर्यावरण संतुलनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच पालक व शिक्षकांना जवळपास ३० औषधी वनस्पतींची रोपे देऊन संवर्धनासाठी प्रेरित केले. यात विशेष करून पानफुटी, लाजाळू, कोरफड, कृष्ण तुळस, नागडोन प्लांट, इन्सुलिन प्लांट अशा वनस्पतीचा समावेश होता. तर गेली सहा महिन्यांपासून पाऊस पडत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्यावरण समतोल राखणारे वृक्ष लावून जगवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रणवरे यांनी केले. या प्रसंगी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे चिटणीस रेवगडे, एनईपी समन्वयक उर्मिला जाधव, संकुल प्रमुख वाव्हळ, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुवर्षा सागवेकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका ऋतुजा गवस, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका नायर, इतर शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.................
सोन्याची चैन, अंगठीची चोरी
पनवेल (बातमीदार) ः राहत्या घरातून सोन्याची चैन आणि अंगठी चोरून नेल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात एक नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. लीला मालू या बालाजी सिम्फनी, सुकापूर येथे राहत असून त्यांनी सोन्याची चैन आणि सोन्याचे अंगठी मेहंदी लागून खराब होईल म्हणून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवले. त्यांनी दुसऱ्या दिवशी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली चैन, अंगठी पाहिले असता ती सापडून आली नाही. २१ ग्राम वजनाचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
.................
ज्वेलर्सच्या दुकानातून कड्याची चोरी
पनवेल (बातमीदार)ः सोन्याच्या दुकानातून पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे लहान बाळाच्या हातातील कडे बुरखा घातलेल्या महिलेने चोरून नेले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड रिचेस ज्वेल आर्केड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली महिला लहान बाळाच्या हातातील सोन्याचे कडे घेण्यासाठी आली होती. यावेळी दुकानदाराने तिच्यासमोर कड्यांचा ट्रे ठेवला. यावेळी त्यातून पसंतीचे कडे शोधत असताना हातचलाखी करून ४.७ ग्राम वजनाचे सोन्याचे कडे हातात लपवून ती बुरख्याच्या खिशात घालून चोरी करून निघून गेली. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

