निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

Published on

निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी
अजित पवारांचा महायुतीच्या विजयासाठी एकजुटीचा सल्ला
अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवे चेहरे, अनुभवी नेते आणि तरुणांना विशेष संधी मिळणार आहे. महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत त्यांनी हे प्रतिपादन केले.

बैठकीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांमधील पक्षीय कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ठाणे ग्रामीणचे प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमळे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर येथील नगर परिषद निवडणुकीची सध्याची स्थिती आणि पक्षाचे स्थानिक वर्चस्व याबाबतची माहिती बैठकीत सादर केली. महिला व बालविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्कमंत्री आदिती तटकरे यांनी स्थानिक नेत्यांच्या संयुक्त सभा घेऊन पक्षाची सद्य:स्थिती आणि स्थानिक अनुकूल वातावरण लक्षात घेऊन युती होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंत्री आदिती तटकरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्या लवकरच बदलापूरचा दौरा करणार आहेत.

कार्यकर्त्यांना अजित पवारांचे आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले, की स्थानिक सद्य:स्थिती आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी परिवारातील प्रत्येक सदस्याने एकजुटीने काम करून पक्षाची विचारधारा, पक्षाने केलेली कामे आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवावे. पक्षाची ताकद दाखवून राष्ट्रवादीला बळकट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. या वेळी खासदार प्रफुलभाई पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक रचना, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि धोरणात्मक नियोजनावर चर्चा केली.

आशीष दामले यांच्या नियुक्तीचा फायदा
बदलापूर येथील कॅप्टन आशीष दामले यांची परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष पवार यांनी विश्वास व्यक्त केला, की त्यांच्या या संविधानिक पदाचा फायदा अंबरनाथसह बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com