शंभर नव्हे, तर एक लाख टक्के कमळच  : जिल्हाध्यक्ष नंदू परब

शंभर नव्हे, तर एक लाख टक्के कमळच : जिल्हाध्यक्ष नंदू परब

Published on

शंभर नव्हे, तर एक लाख टक्के कमळच : जिल्हाध्यक्ष नंदू परब
अंबरनाथ, ता.६ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेवर यंदा शंभर नव्हे, तर एक लाख टक्के कमळच फुलणार” असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ही घोषणा करताच कार्यकर्त्यांच्या घोषणांनी स्वानंद हॉल दणाणून गेला.अंबरनाथ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या मेळाव्यात तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांच्या नावावर एकमत झाले आहे. बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ पूर्व येथील स्वानंद हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीला जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार कुमार आयलानी, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, समन्वयक शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी एकमताने तेजश्री करंजुले यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला. परंतु, अजून चार इच्छुक उमेदवारांची नावे वरिष्ठांकडे पाठवली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. “जो उमेदवार मिळेल, त्याच्या नावावर सगळे कार्यकर्ते एकजूट होऊन काम करतील. आम्ही ‘कमळ’ चिन्ह पाहूनच काम करतो, असे परब यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत तेजश्री करंजुले म्हणाल्या, “भाजपने न्याय दिला तर आम्ही अंबरनाथ शहरासाठी नव्या विकास व्हिजनसह काम करू. वर्षभर समाजकारण करणारे कार्यकर्तेच या शहराचा खरा आधार आहेत. त्यांच्या उत्साही वातावरणात ‘घराघरात कमळ’ फुलवण्याचे आमचे ध्येय आहे.” अंबरनाथच्या पारंपरिक शिवसेना बालेकिल्ल्यात यंदा भाजपकडून “स्वबळावर विजय” मिळवण्याची खात्री पक्ष नेतृत्वाने व्यक्त केल्याने राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com