ऑक्टोबर महिना पनवेलकरांसाठी दिलासादायक
ऑक्टोबर महिना पनवेलकरांसाठी दिलासादायक
ढगाळ वातावरण; कमी उकाड्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा विसर
नवीन पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः दरवर्षीप्रमाणे ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास न होत यंदा पनवेलकरांनी दिलासादायक हवामानाचा अनुभव घेतला. दरवर्षी या महिन्यात तापमानात झपाट्याने वाढ होऊन प्रखर उकाडा जाणवतो. यंदा मात्र मॉन्सूनचा उशिरा निरोप, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींमुळे पनवेल परिसरात तापमान नियंत्रणात राहिले.
सामान्यतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर जातो, पण यंदा १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने उष्णता वाढू शकली नाही. त्यानंतर काही दिवस उन्हाचा चटका जाणवला असला तरी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेले नाही. पुढे १८ आणि १९ ऑक्टोबरला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाल्याने सूर्यप्रकाशाचा तीव्रपणा कमी झाला आणि वातावरणात आर्द्रतेऐवजी आल्हाददायक थंडावा निर्माण झाला. महिन्याच्या अखेरीपर्यंत आकाश ढगाळ राहिल्याने जमिनीवर थेट सूर्यकिरण पोहोचले नाहीत. परिणामी तापमान सरासरी राहिले. यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ऐवजी थंडाव्याची चाहूल नागरिकांना मिळाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून सकाळी आणि संध्याकाळी हलकी गारवा जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, तापमानात घट झाल्याने विजेच्या वापरातही घट झाली आहे.
.............
विजेची मागणीही घटली
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा ऑक्टोबर महिन्यात नेहमीपेक्षा विजेची मागणी लक्षणीयरीत्या कमी राहिली. गेल्या काही वर्षांत ज्या प्रमाणात अतिरिक्त पुरवठ्याची गरज भासते, ती यंदा कमी झाली आहे. उष्णतेतील घट आणि वातानुकूलन उपकरणांचा कमी वापर यामुळे ही मागणी घटल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

