२७ गावं स्वतंत्र नगर परिषदेच्या मागणीसाठी आमदार खासदारांचा रास्ता रोको

२७ गावं स्वतंत्र नगर परिषदेच्या मागणीसाठी आमदार खासदारांचा रास्ता रोको

Published on

२७ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषदेची हाक
कल्याण-शिळ रोडवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीने पुन्हा जोर धरला आहे. या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ७) कल्याण-शिळ राष्ट्रीय महामार्गावर मानपाडा सर्कल येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
२७ गावांना वेगळे करून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना या गावांची प्रभागरचना येत्या पालिका निवडणुकीत करण्यात आलेली आहे. याला २७ गावे सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने विरोध केला आहे. केडीएमसीमध्ये समाविष्ट २७ गावांमध्ये कर आकारणी, परवानग्या आणि पायाभूत सुविधांचा अभाव असून, महापालिका विकासकामांमध्ये असमर्थ असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या आंदोलनाला भाजपचा खुला पाठिंबा जाहीर झाला असून, मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेससह सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली होती. मानपाडा सर्कल येथे जवळपास दोन तास ठिय्या देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सरकारविरोधात घोषणा दिल्या. आमदार आणि खासदार रस्त्यावर उतरल्याने या मागणीला नवे राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

मागणीला राजकीय गती
आमदार कथोरे यांनी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका असल्याचे स्पष्ट केले असून, लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले, तर खासदार म्हात्रे यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आक्रमक इशारा दिला. दोन तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनामुळे २७ गावांच्या नगर परिषदेसाठीचा लढा आता केवळ ग्रामस्थांपुरता मर्यादित न राहता राज्य सरकारपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com