थोडक्यात ठाणे
ठाण्यात विशेष योग परिसंवाद
ठाणे, ता. ७ (बातमीदार) ः घंटाळी मित्र मंडळ ठाणे योग विभाग आणि इंडियन योग असोसिएशन महाराष्ट्र राज्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे (सत्यकर्मानंद) यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ९ नोव्हेंबरला सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत सहयोग मंदिर, नौपाडा, ठाणे येथे होणार आहे. “उपचार पद्धतींचा तौलनिक आढावा” या विषयावर आधारित या परिसंवादात विविध पर्यायी उपचार पद्धतींचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात योग संशोधक गंधार मंडलिक यांचे बीज भाषण होईल. त्यानंतर विनोद जोशी “यौगिक समुपदेशन”, डॉ. नम्रता गोरे “आयुर्वेद”, अंजना राठी “लंघन एक वरदान” आणि दर्शना मेस्त्री “प्राणिक हिलिंग” यावर आपली मते मांडतील. शेवटी योग विभागप्रमुख धर्मव्रतानंद (श्रीकृष्ण म्हसकर) “योग एक उपचार पद्धती” या विषयावर मार्गदर्शन करतील.
----
‘द वूमन ऑफ इंडिया’ पुस्तकाचे चित्रप्रदर्शन
ठाणे, ता. ७ (बातमीदार) : शहरातील डॉ. बेडेकर हॉस्पिटलतर्फे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त हॉस्पिटल व प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या वतीने ‘द वूमन ऑफ इंडिया’ पुस्तकाचे ऐतिहासिक चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार, ९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता चित्रकार व कला समीक्षक सुहास बहुलकर यांच्या हस्ते होईल. चित्रप्रदर्शन रविवार, ९ ते मंगळवार ११ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे येथे असेल.
-------
एमसीएचआयतर्फे भव्य पुनर्विकास प्रदर्शन
ठाणे, ता. ७ (बातमीदार): ठाणेच्या पुनर्विकासाला नवी दिशा देण्यासाठी क्रेडाई-एमसीएचआयतर्फे ८ व ९ नोव्हेंबरला रेमंड ग्राउंड, ठाणे येथे भव्य पुनर्विकास प्रदर्शन व अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले की, नवीन एफएसआय नियमांमुळे गृहसंस्थांना जुन्या इमारती आधुनिक स्वरूपात रूपांतरित करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या कार्यक्रमात समाजांच्या पुनर्विकास प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जाईल. सभासद, पदाधिकारी आणि निर्णयकर्त्यांनी या प्रदर्शनाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

