ठाण्याने अनुभवाला शुद्ध हवेचा आठवडा

ठाण्याने अनुभवाला शुद्ध हवेचा आठवडा

Published on

ठाण्याने अनुभवाला शुद्ध हवेचा आठवडा
विविध उपाययोजनांमुळे गुणवत्तेत वाढ
राजीव डाके, सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. ७ ः राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. मुंबईची हवासुद्धा आरोग्याला चांगली नाही. नवी मुंबईची हवा दम्याच्या रुग्णांसाठी त्रासदायक आहे. अशावेळी ठाणेकरांनी मात्र शुद्ध हवेचा आठवडा अनुभवला आहे. ठाण्यातील रस्त्यांवरील झाडांची संख्या, मेट्रो पुलाखाली वाढवलेली हिरवळ आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा हिरवा निसर्ग ठाण्याची हवा शुद्ध ठेवण्याला कारणीभूत ठरला आहे.
दिवाळीचा उत्सव संपल्याने या दिवसांमध्ये फोडलेल्या फटाक्यांच्या धुराचे हवेतील प्रमाण आणि धुळीचे प्रदूषण कमी झाले. दिल्ली, मुंबईसारखी शहरे मात्र आजही प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे. त्यांची हवा काही प्रमाणात शुद्ध जरी झालेली असली तरी ती अद्यापही आरोग्याला हानिकारकरच असल्याचे हवेमधील प्रदूषणाची आकडेवारी सांगते. ठाण्याने मात्र याला छेद देत हवेची गुणवत्ता जपली असल्याचे प्रदूषण मापक यंत्र सांगत आहे. त्यामुळे आगामी काळातही ठाण्याची हवा अशीच शुद्ध राहावी, अशी अपेक्षा प्रदूषण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
ठाण्यात घोडबंदर रस्ता, माजिवडा-खारेगाव टोल रस्ता रुंदीकरण, वडवली, भिवंडी मेट्रो कामे सुरू आहेत. नव्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. डिझेल, पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील हवेचे प्रदूषण वाढलेले दिसत नाही.
--
चांगल्या हवेची कारणे
अवकाळी पाऊस, मेट्रो पुलाखाली आणि रस्त्यांमध्ये लावलेली शोभेची झाडे, उड्डाणपुलांवरील झाडांच्या कुंड्या, जनजागृती, चौकांमधील पाणी फवारणी यंत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेचे एकत्रित काम.
--
---कोट--
पाऊस पडल्याने हवेमधील धूळ आणि इतर घटक खाली बसण्यास मदत झाली आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत लोकदेखील जागृत होत आहेत. मंडळाने दिवाळीमध्ये फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत जनजागृती केली होती. पालिकेला वेळोवेळी निर्देश दिले आहेत. प्रदूषण पसरविणाऱ्यांवर मंडळाची नजर आहे.
- संजीव रेदासानी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे

ठाण्याच्या हवेचे मानक (पीएम २.५ ) :
३० ऑक्टोबर - ३३
३१ ऑक्टोबर - ४३
१ नोव्हेंबर- २९
२ नोव्हेंबर - ३३
३ नोव्हेंबर - ३५
४ नोव्हेंबर - ३७
५ नोव्हेंबर - ३८
० ते ५० निर्देशांक दर्शविणारी हवा चांगल्या गटात येते.

दिल्ली - ३८०
मुंबई - १७६
(हवा गुणवत्तेची आकडेवारी निर्देशांकात
---
कोट फोटो : संजीव रेदासानी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com