वंदे मातरम् गीताच्या आठवणी

वंदे मातरम् गीताच्या आठवणी

Published on

वंदे मातरम् गीताच्या आठवणी पुढच्या
पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे ः रवींद्र चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : “वंदे मातरम्’ या गीतातून स्वातंत्र्यसैनिकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. या गीताने देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. आजही ती तितकीच तेजस्वी आहे. या अमर गीताच्या आठवणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी (ता. ७) ठाण्यात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, नारायण पवार, अमित सरेय्या यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतांवर सादर केलेल्या आकर्षक फ्लॅश मॉबने वातावरण देशभक्तीने भारावून गेले. या वेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, संपूर्ण देश गुलामगिरीच्या जोखडाखाली असताना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ या कादंबरीतून ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले. नंतर रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रथम सादर केले. त्यानंतर ते राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. या गीताने देशातील जनतेच्या मनात स्वाभिमान, देशप्रेम आणि स्वातंत्र्याची ज्वाला चेतवली. ते पुढे म्हणाले, “आज देशाची खरी सेवा करायची असेल, तर १३० कोटी भारतीयांनी स्वदेशीचा संकल्प करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. ‘मेड इन इंडिया’ संकल्पना मूर्त स्वरूपात आणून आपण आत्मनिर्भर भारत घडवू शकतो. कार्यक्रमादरम्यान देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण झाले, तर ठाणेकर नागरिकांनी सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’ गायन करून देशभक्तीची भावना व्यक्त केली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com