ज्येष्ठ अभिनेत्री झरीन खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री झरीन खान यांचे निधन

Published on

ज्येष्ठ अभिनेत्री झरीन खान यांचे निधन

मुंबई, ता. ७ : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नामांकित इंटेरियर डिझायनर झरीन खान यांचे आज निधन झाले आहे. त्या ८१व्या वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारांशी त्या झुंज देत होत्या. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचे पती अभिनेते संजय खान आणि दोन मुली व एक मुलगा अभिनेता जायेद खान असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत आणि फॅशन-जगतात शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी झरीन यांनी थोडक्यात पण उल्लेखनीय असा अभिनय प्रवास केला होता. ‘तेरे घर के सामने’ आणि ‘एक फूल दो माली’ या चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या, मात्र विवाहानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जात इंटेरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची मुलगी सुजैन खान यांनीही त्याच क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली. झरीन खान यांनी केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर पाककलेतही आपला ठसा उमटवला. त्यांनी ‘फॅमिली सीक्रेट्स’ या नावाचे पाककृती पुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात त्यांच्या कुटुंबातील पारंपरिक रेसिपींचा समावेश होता. यावर्षी जुलै महिन्यात झरीन खान यांनी आपला ८१वा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी मुलगी सुजैन खान हिने समाजमाध्यमावर आईसाठी भावनिक संदेश शेअर करीत म्हटले होते, ‘‘माझी सुंदर आई, माझ्या प्रत्येक कृतीत तुझा आशीर्वाद आहे. तू माझ्या आयुष्याला अर्थ दिलास.’’ झरीन खान यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने आणि डिझाइन जगतातील एका मोहक, सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला मुकले आहे. त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा आणि कौटुंबिक मूल्यांचा ठसा त्यांच्या मुलांमधून कायम जाणवत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com