पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेसल वापरणाऱ्यांना लागू नाही - उच्च न्यायालय
गॅस, स्टोव्ह, ग्रीलवर बंदी; इंडक्शन व्हेसल मात्र अपवाद
पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेसल वापरणाऱ्यांना लागू नाही ः उच्च न्यायालय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः गॅस, स्टोव्ह किंवा ग्रीलच्या मदतीने पदपथावर अन्न शिजवण्यास मनाई करणारे मुंबई महापालिकेने २०१८ मध्ये काढलेले परिपत्रक ‘जय जवान’सारख्या इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेसल वापरणाऱ्या फूड जॉइंट्सला लागू होत नाही, असे उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने नुकतेच स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेसलमध्ये मासे तळून त्याची विक्री करण्यापासून माजी सैनिक राजिंदर सिंग यांना रोखण्यात आले होते. त्याबाबतचा आदेश १४ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिकेने काढला होता. तसेच, या कारवाईसाठी पदपथ किंवा रस्त्यावर गॅस, स्टोव्ह, ग्रीलच्या मदतीने अन्नपदार्थ शिजवण्यापासून मज्जाव करणाऱ्या २०१८च्या परिपत्रकाचा दाखलाही दिला होता. त्या निर्णयाला सिंग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, या परिपत्रकाच्या आधारे याचिकाकर्त्यावर कारवाई करण्याचा महापालिकेने आदेश बेकायदा असल्याचे नमूद करीत न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या एकलपीठाने तो रद्द केला.
----
माजी सैनिकाला दिलासा
याचिकाकर्ता माजी सैनिक असून, ते १९६५ आणि १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झाले होते. युद्धात त्यांना अपंगत्व आले. काही वर्षांपूर्वी त्यांनी वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील लोकप्रिय फूड जॉइंटवर तळलेल्या माशांची विक्री करतात. तथापि, २२ जानेवारी २०१९ रोजी तपासणी पथकाच्या पाहणीत सिंग हे मासे तळण्यासाठी १८ इंचाच्या इलेक्ट्रॉनिक इंडक्शन व्हेसलचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी २०१८च्या परिपत्रकाचा आधार घेऊन याचिकाकर्त्याला तळलेले मासे विकण्यास मनाई केली. या आदेशाविरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

