खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाचा खटला
खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाचा खटला
कुर्ला बस दुर्घटनाप्रकरणी आरोप निश्चित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः कुर्ला पश्चिम येथील बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरेवर खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाने नुकताच सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला.
गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता कुर्ला पश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावर चालक मोरेचे नियंत्रण सुटल्याने बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी मोरेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०५ अंतर्गत सदोष मनुष्यवध, कलम ११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, कलम ११८ (१) अंतर्गत स्वेच्छेने दुखापत करणे, यासह इतर कलमांखाली आरोप निश्चित केले. या आरोपांत मोरेला दोषी ठरविल्यास त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्रकरणातील इतर दोन आरोपी आणि अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसची मालकी असलेल्या दोन खासगी कंपन्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाने दोषमुक्त केले होते. त्यात एव्ही ट्रान्स (एमयूएम) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटीगंडला आणि मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशी यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

