शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग

Published on

शहाड उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला वेग
पर्यायी मार्गही युद्धपातळीवर तयार
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) ः उल्हासनगर येथील शहाड उड्डाणपूल दुरुस्तीच्या काम वेगाने सुरू आहे. केवळ तीन दिवसांत संपूर्ण जुने डांबर काढून काम पुढच्या टप्प्यात पोहोचले आहे. आता ब्रिजवर लेयरिंगची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या पर्यायी मार्गाचीही उल्हासनगर महापालिकेने युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू केली आहे.

गेले तीन दिवस जोरात सुरू असलेले जुने डांबर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. लेयरिंगच्या पुढील टप्प्यासाठी ब्रिजची साफसफाई करण्यात येत असून, काही तासांतच पृष्ठभाग तयार करण्याचे काम सुरू होईल. हे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून आमदार कुमार आयलानी स्वतः नियमित दौरा करत आहेत. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आमदारांनी ठेकेदाराला कामाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर मनुष्यबळ वाढवण्यात आले. एकूण सहा जेसीबी मशीन आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने डांबर काढण्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे. शहाड उड्डाणपूल बंद असल्याने खालील पर्यायी मार्गावर मोठा ताण पडत आहे. यामुळे उल्हासनगर महापालिकेने आजपासून या मार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेतली आहे.

दुरुस्तीची ठिकाणे
कटकेश्वर मंदिरासमोरून सुरुवात झालेल्या कामात ब्रिजच्या दोन्ही बाजूंवरील खोल खड्डे, स्मशानभूमी चौकापर्यंतची दुभरण, वाहनचालकांना अडथळा निर्माण करणारे खड्डेमय भाग आणि सर्व ठिकाणचे खड्डे भरून वाहतूक सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त साहित्य आणि मनुष्यबळ आणण्यात आले आहे.

पाणी गळतीची समस्या
पर्यायी मार्गावर काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याचे आढळले आहे. उल्हासनगर महापालिकेचा जलपुरवठा विभाग ही सर्व ठिकाणांची गळती बंद करण्याचे काम करणार आहे. गळती बंद झाल्यावर लगेच त्या भागांचे खड्डे भरून मार्ग पूर्णपणे सुरेख केला जाईल.

नागरिकांसाठी दिलासा
ब्रिजवरील आणि पर्यायी मार्गावरील काम वेगाने पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्ही पातळीवर कामाला गती देत असल्याने, शहाड ब्रिज ठरलेल्या वेळेत नागरिकांसाठी खुला होण्याची अपेक्षा अधिक बळकट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com