सरकारच्या २०४७ च्या व्हिजन मध्ये आदिवासी कातकरीचे अस्तित्व उपेक्षित

सरकारच्या २०४७ च्या व्हिजन मध्ये आदिवासी कातकरीचे अस्तित्व उपेक्षित

Published on

सरकारच्या व्हिजनमध्ये आदिवासी कातकरींचे अस्तित्व उपेक्षित
विवेक पंडित यांनी व्यक्त केली खंत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : २०४७चं व्हिजन सांगणारं सरकार, तेव्हा कातकरी अस्तित्वात तरी राहतील का? जर आजच्या घडीला त्यांचा जमिनीचा, घरकुलाचा आणि जगण्याचा हक्क सुरक्षित केला नाही, तर २०४७ पर्यंत हा समाज नकाशावरूनच पुसला जाईल, अशी खंत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केली. श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.
या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रमजीवीच्या निर्धार आंदोलनाला भेट दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रमजीवी संघटनेच्या सभासदांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत गेल्या ४० वर्षांपासूनच्या मूलभूत मागण्या न्याय्य असून त्या सरकारच्या लक्षात आहेत. त्यावर चर्चा करून तातडीने तोडगा काढू, असे आश्वासन दिले. आदिवासी कातकरी समाजाच्या अस्तित्वासाठी, परिवर्तनासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना आत्मक्लेश करावा लागतो, याचे सरकारला दुःख आहे, असे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी बांधवांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी (ता. ११) मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

...तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसू
१९७६ मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे २६ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व गावठाणातील कातकरी बांधवांना घरकुल मिळाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क स्वतःच्या हाताने हिसकावून घेऊ, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

आगाऊ पैसे फिटले
ज्या मालकांनी मजुरांना आगाऊ रक्कम दिली आहे त्या मजुरांना आता कामावर जाण्याचं बंधन नाही. मालकांनी आदिवासी कातकरींना दिलेले आगाऊ पैसे आजपासून फिटले, असे विवेक पंडित यांनी श्रमजीवीच्या सभासदांना जाहीरपणे सांगितले. दरम्यान, आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाला आलेल्या श्रमजीवीच्या हजारो सभासदांनी चुली पेटवून एकत्र जेवण केले. त्यानंतर पारंपरिक गौरी, तारपा, डबा नाच नाचून आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com