खासदार कला क्रीडा महोत्सवाला सुरूवात

खासदार कला क्रीडा महोत्सवाला सुरूवात

Published on

खासदार कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात
जोगेश्‍वरी, ता. ९ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘खासदार कला क्रीडा महोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य महोत्सवाचे उद्‌घाटन अंधेरी (पश्चिम) येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात होणार आहे. या महोत्सवात कॅरम, कबड्डी, फुटबॉल, कुस्ती, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मॅरेथॉन, क्रिकेट, योगा अशा मिळून १५ क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. १६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध मैदानांवर स्पर्धा पार पडतील. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, चषक, मेडल व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर असून www.ravindrawaikar.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. ही स्पर्धा फक्त मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी खुली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com