नॅशनल पार्कातील वनराणी धावणार कधी?
नॅशनल पार्कातील वनराणी धावणार कधी?
पाच वर्षांपासून बंद; पर्यटकांचा हिरमोड
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन वनराणी कधी धावणार, असा प्रश्न भेट देणारे पर्यटक विचारत आहेत. २०२१च्या ‘तौक्ते’ वादळात वनराणी बंद पडली होती. तेव्हापासून पर्यटकांचा हिरमोड आहे.
१९७४ मध्ये सुरू केलेली, दरवर्षी जवळपास ५० लाखांचा महसूल देणारी पर्यटकांची लाडकी, लहानांपासून मोठ्यांना भुरळ पाडणारी, आकर्षित वनराणी म्हणजेच मिनी टॉय ट्रेन २०२१ वादळात बंद पडली होती. तब्बल चार वर्षांनंतर वनराणी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न प्रगतिपथावर होता. आता दिवाळीदेखील गेली तरीही वनराणी सुरू होत नसल्याने पर्यटकांनी खंत व्यक्त केली आहे.
लाखो पर्यटकांना आकर्षित करणारी वनराणी थांबल्याने, पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे. टॉय ट्रेनचे काम प्रगतिपथावर आहे. चाचण्यादेखील यशस्वी झाल्या आहेत. पर्यटकांसाठी लवकरच मिनी टॉय ट्रेन सेवेत रुजू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक अनिता पाटील यांनी दिली.
आकर्षक नूतनीकरण
कृष्णगिरी येथून सुटणाऱ्या वनराणीच्या मार्गाचे, रुळाचे तसेच मार्गातील कृत्रिम बोगद्याचे एवढेच नव्हे तर, कृष्णगिरी स्थानकाला फुलपाखराचे स्वरूप देऊन आकर्षक नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रूपात, प्रशस्त वनराणीचे नवीन डबे, नवीन आसन व्यवस्था, पारदर्शक डबे पर्यटकांना तसेच बच्चे कंपनीला दिलासा देणारे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

