विद्यार्थ्यांनी साकारला ‘वंदे मातरम्’चा गौरवमय प्रवास

विद्यार्थ्यांनी साकारला ‘वंदे मातरम्’चा गौरवमय प्रवास

Published on

विद्यार्थ्यांनी साकारला ‘वंदे मातरम्’चा गौरवमय प्रवास
ऐरोली विद्यालयात देशभक्तीचा अनोखा उत्सव
नवी मुंबई, ता. ८ (बातमीदार) : वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऐरोली येथील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित ऐरोली माध्यमिक विद्यालयात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या गीताचा गौरव साजरा करत विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविले.
१८७५ रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नवसंजीवनी दिली होती. ‘आनंदमठ’ कादंबरीत समाविष्ट झाल्यानंतर हे गीत देशभर पसरले. रवींद्रनाथ टागोर यांनी त्याला स्वर दिला आणि १८९६ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच गायले गेले. स्वातंत्र्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला.
या ऐतिहासिक गीताच्या स्मृतिदिनानिमित्त ऐरोली विद्यालयात सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ८५० विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, तर २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ची प्रतिकृती साकारून देशभक्तीचा संदेश दिला.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांच्या प्रेरणेने शिक्षक सुधीर पाटील आणि रविराज जाधव यांनी हा उपक्रम यशस्वी केला. सचिव तुकाराम नांदुगडे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीचे संस्कार जोपासण्याचे आवाहन केले. संचालक दादासो यादव व मुख्याध्यापक शंकरराव देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील यांनी केले, तर आभार विरोजे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com