भाजपविरोधात महाआघाडी मैदानात
भाजपविरोधात महाआघाडी मैदानात
उरण नगर परिषद निवडणुकीत चुरशीच्या लढती
उरण, ता. ८ (वार्ताहर) ः नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उरण नगर परिषदेमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने उरण नगरपालिका निवडणुकीत यंदा भाजप विरुद्ध महाआघाडी अशी रंगत रंगणार असल्याने आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
उरण नगरपालिकेवर काँग्रेसनंतर भाजपने अनेकदा वर्चस्व मिळविले आहे. २०१६च्या निवडणुकीत उरण नगर परिषदेत भाजप, शिवसेना आणि शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झाला. नऊ प्रभागांमधून १८ सदस्यांपैकी भाजपचे १३ सदस्य निवडून आले होते. तर नगराध्यक्षपद हे महिला आरक्षण असल्याने भाजपच्या सायली म्हात्रे या निवडून आल्या होत्या. तर शिवसेनेचे पाच सदस्य निवडून आले होते. काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीला एकही सदस्य मिळालेला नाही. वाढत्या लोकसंख्येच्या नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभागांची संख्या १० होऊन २१ सदस्य संख्या झाली आहे; मात्र या २०२५ निवडणुकीत नगराध्यक्षसाठी महिला राजचे आरक्षण आल्याने अनेकांनी नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला आहे.
--------------------------------
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
२०२५ निवडणूक भाजप स्वतंत्र लढत असून त्यांच्याविरोधात ठाकरे गट, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशी आघाडी करून एकत्र लढणार आहेत. त्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीला होऊन सदस्य संख्येत वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. २०१६ मध्ये भाजपची एक हाती सत्ता होती. आपली सत्ता राखण्यासाठी आमदार महेश बालदी यांचे वर्चस्व पणाला लागणार आहे.
महाविकास आघाडी मोठी असल्याने माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, शेकापचे चिटणीस जयंत पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

