लघु उद्योगांना शासकीय याेजनांचे बळ
लघु उद्योगांना शासकीय याेजनांचे बळ
विस्ताराची माेठी संधी; ‘एमटीएएम’अंतर्गत नोंदणी शिबिर
ठाणे, ता. ८ ः द नॅशनल स्माॅल इंडस्ट्रीज कोर्पोरेशन लिमिटेड, वाशीतर्फे आयोजित ‘एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’(एमटीएएम)अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांसाठी (एमएसएमई) शासनमान्य विनामूल्य नोंदणी शिबिर नुकतेच पार पडले. ठाणे (पश्चिम) येथील टीएसएसआयए हाउस येथे झालेल्या या शिबिराला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यवसायवृद्धीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचा लाभ घेऊन व्यवसायाचा विस्तार करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या प्रारंभी स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी प्रास्ताविकात सहभागींना यापुढेही त्यांच्या व्यवसायाशी निगडित विविध प्रकारची मदत दिली जाईल, अशी ग्वाही चांडक यांनी दिली. यानंतर एनएसआयसी, मुंबई शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक राजेंद्रसिंग जाडून यांनी सर्वांचे स्वागत केले. शिबिराचा सहभागी उद्योजकांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दीपप्रज्वलनानंतर आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी मार्गदर्शन केले. अन्नप्रक्रिया व अन्नसेवा उद्योगात प्रचंड संधी आहेत. उद्योजक, व्यावसायिकांनी मोठे स्वप्न बघण्याचे त्यांनी आवाहन केले. यानंतर ‘टीसा’च्या भिवंडी शाखेचे अध्यक्ष निनाद जयवंत यांनी आपल्या संघटनेबाबतची माहिती दिली. यापुढेही सदस्य उद्योजकांसाठी अशा प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळांचे आयोजन करणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा उद्याेग केंद्र (डीआयसी) ठाणेच्या सरव्यवस्थापिका सोनाली देवरे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय लघुउद्याेग महामंडळाचे (एनएसआयसी) विभागीय सरव्यवस्थापक डी. डी. माहेश्वरी यांनी या योजनेसहित एकंदरीत महामंडळाच्या उद्दिष्टांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. एनएसआयसीचे व्यवस्थापक चिरो सुमीत यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. युनियन बँक ऑफ इंडिया एमएसएमई विभागातील उपसरव्यवस्थापक शशी कांत यांनी एमएसएमई बँकिंग प्रक्रियेबाबत माहिती दिली.
चेनलीअरचे संचालक सिद्धार्थ दास यांनी उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. या शिबिरात कॅम्पमध्ये उद्योजकांची ओएनडीसीवर नावनोंदणी करून घेतली. उद्याेजिका सविता कळवले यांनी त्यांच्या उद्योगाची यशोगाथा मांडली. विसडम एक्स्ट्राच्या गौरी बैरागी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपक्रमाला डीआयसी ठाणे यांचे, ओडीओपी विभागाचे, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांच्या पीएमएफएमई विभागाचे सहकार्य लाभले. नॉलेज पार्टनर म्हणून विसडम एक्स्ट्रा या संस्थेने काम पाहिले. उपक्रमाच्या संयोजनात विसडम एक्स्ट्राच्या निखिलेश काळे, स्वाती देवरे, तिलक रोकैया, स्वप्नील साळवे, सानिका गिलबिले, भारत शेंडगे तसेच टिसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
१२० उद्याेजकांचा सहभाग
ठाणे, भिवंडी, रायगड, मुलुंड, वाशिम आदी विविध भागांतून सुमारे १२० उद्योजकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाचे आयोजक म्हणून एनएसआयसी आणि सहआयाेजक म्हणून स्त्री उद्यमी फाउंडेशन, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, टीसा या संघटनांनी भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

