महायुतीचा भगवा फडकवा
महायुतीचा भगवा फडकवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ‘‘आपल्याला आता आपली ताकद दाखवायची आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे,’’ असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यात केले.
शिवसेना शिंदे गट पुरस्कृत साई दर्शन फाउंडेशनतर्फे आयोजित महिला बचत गट स्नेहसंमेलन २०२५ प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की आपला अजेंडा खुर्ची नाही, तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आहे. संपत्ती नव्हे, तर माणसांचे प्रेम कमावणे महत्त्वाचे आहे. ‘जिथे संकट तिथे शिवसेना’ हे समीकरण आजही कायम आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळली आहे. ‘‘आमच्या लाडक्या बहिणींना आता लखपती झालेले पाहायचे आहे. १,५०० रुपयांपासून सुरू झालेली बचत ही त्यांच्या आत्मविश्वासाचे आज प्रतीक बनली आहे. येणाऱ्या निवडणुकीत याच बहिणींची ताकद दाखवायची आहे.’’ ठाण्यातील विकासकामांवर शिंदे म्हणाले, ‘‘ठाणे बदलते आहे. क्लस्टर योजना प्रत्यक्षात आली असून, १८ मजल्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. किसननगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्यनगर येथील धोकादायक इमारतींमध्ये राहणारे लोक लवकरच स्वतःच्या घरात जाणार आहेत. हे माझे स्वप्न होते आणि शब्द पाळणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

