दहिसरचा टोलनाका वसईत
दहिसरचा टोलनाका वसईत
स्थलांतरणावरून भूमिपुत्रांचा प्रताप सरनाईकांना घेराव
विरार, ता. ८ (बातमीदार) : दहिसरचा टोलनाका वसईच्या हद्दीतील सासूनवघर येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींवरून वसईचे भूमिपुत्र आणि स्थानिक गावकरी आज आक्रमक झाले. पाहणी दौऱ्यासाठी आलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी एकत्र जमून घेराव घातला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईच्या वेशीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी (ता. ८) टोलनाका स्थलांतरित करण्याची योजना होती. मात्र मिरा-भाईंदरकरांना दिलासा देण्यासाठी हा टोलनाका वसईच्या हद्दीत आणला जात असल्याने वसईच्या भूमिपुत्रांनी या स्थलांतराला कडाडून विरोध दर्शविला आहे.
सरनाईक यांनी शनिवारी ससूनवघर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. याचवेळी काँग्रेस नेते विजय पाटील, भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी सरनाईकांच्या दौऱ्याला विरोध करीत ‘वसईच्या हद्दीत टोलनाका होऊ देणार नाही,’ अशी ठाम भूमिका मांडली. या वेळी ‘एनएचएआय हाय हाय’ आणि अधिकाऱ्यांविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
स्थानिकांनी दहिसर टोलनाका महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या मार्गावर असून, स्थलांतरित केला जाणारा ससूनवघरचा मार्ग महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत येतो. त्यामुळे कायद्यानुसार हे स्थलांतर अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
============
वाहतूक कोंडीमुळे ससूनवघरजवळ आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजल्याने आपण ग्रामस्थांच्या बाजूने उभे आहोत. रस्त्याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. १३) मंत्रालयात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. काही लोकांनी यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

