कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ११

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ११

Published on

निवडणुकीची आरक्षण सोडत उद्या
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्य मंदिरात निघणार
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागरचनेनंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत. मंगळवारी (ता. ११) पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्य मंदिरात प्रभाग आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षित प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे या प्रभाग आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आगामी पालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेची आगामी पालिका निवडणुका प्रथमच चार सदस्यीय पॅनेल पद्धतीने घेतली जाणार आहे. यात १२२ सदस्य निवडीसाठी १२२ प्रभागातून चार सदस्यांचे २९ पॅनेल, तर तीन सदस्यांचे दोन पॅनेल अशा ३१ पॅनेलची निवडणूक घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रभागरचना जाहीर करून तिला सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आचार्य अत्रे नाट्य मंदिरात ही सोडत काढली जाणार असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार कल्याण-डोंबिवली पालिकेची एकूण लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख ५० हजार १७१ असून, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ५८४ आहे. या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारावरच प्रशासनाकडून प्रभागांचे आरक्षण ठरवण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १०, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तीन सदस्य असे १३ प्रभाग आरक्षित असणार आहेत. उर्वरित १०९ प्रभागांची सोडत काढण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे रोजीच्या निर्देशानुसार मागासवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के जागा राखीव होणार आहे.

आरक्षणाचा कार्यक्रम
सोडतीनंतर १७ नोव्हेंबरला प्रसिद्धी, २४ नोव्हेंबरला हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख असून, २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत हरकतींचा विचार व अंतिम आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण म्हणून जाहीर केला जाईल.

सोडतीकडे लक्ष
पालिका निवडणूक २०२५ प्रथमच पॅनेल पद्धतीने होणार असल्याने सर्वच वर्गाची आरक्षणे नव्याने सोडत पद्धतीने काढली जाणार आहे. यामुळे कोणता प्रभाग महिलांसाठी राखीव असणार, कोणता प्रभाग ओबीसी, एसी, एसटी प्रवर्गासाठी आरक्षित पडणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील आरक्षणाचे गणित
एकूण प्रभाग : १२२
एससी (अनुसूचित जाती) ः १०
एसटी (अनुसूचित जमाती)ः ३
ओबीसी (मागासवर्गीय)ः ३३
सर्वसाधारण ः ७६

एकूण आरक्षित प्रभाग : ४६
महिला आरक्षण : ५० टक्के म्हणजेच ६१ प्रभाग महिलांसाठी राखीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com